बार्शी – जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार विजयामुळे संघाची पुणे विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व खेळाडूंना विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे.
याच स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक पुष्कराज पाटील, योगेश उपळकर, विकास पाटील व शिवराज बांरगुळे यांचे मार्गदर्शन लाभले
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मिराताई यादव, सदस्य एस. बी. शेळवणे व बी. के. भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य, संस्था सदस्य, प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 12