सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दैनिक तरुण भारत डिजिटल विभाग आणि इन न्यूज चैनल सोलापूर यांच्या वतीने नवे दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सोलापुरातील नामांकित शाळांनी सहभाग नोंदविला होता यात काही शाळांनी नाटिकांचे सादरीकरण केले आणि संतांची माहिती दाखविली तर काही शाळांनी पारंपारिक टाळ मृदंगाचा खेळ सादर केला तर काही शाळांनी ग्रंथराशीच्या शब्दसमनांचे विठ्ठल चरणी भेट सादर करत सोने चांदी नाही तर पुस्तकांच्या राशी वाहतो देवा असे म्हणत आपला उत्कृष्ट सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत सरस्वती प्रशाला, सिद्धेश्वर बालक मंदिर विवेकानंद पब्लिक स्कूल, संगमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे वस्ती, नुमवी प्रशाला, नीलकंठेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर प्राथमिक प्रशाला या शाळांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या संकल्पना राबवत पारंपारिक महाराष्ट्राच्या वारीचे दर्शन आणि आधुनिक विचार व सामाजिक संदेश पेरले. प्रशालेत वेगवेगळ्या सामाजिक संदेशाचे बोर्ड आणि पंढरीच्या वारीतील बाजाराचे आणि भिंतीवरून चालणाऱ्या ज्ञानेश्वरी मुक्ताई सोपान निवृत्तीनाथाचे दर्शन दाखवण्यात आले. सिद्धेश्वर बालक मंदिरात संतांची विठ्ठला प्रति असलेल्या भक्तीतील प्रेम नाटकाच्या माध्यमातून विविध संतांच्या प्रसंगातून सादर करण्यात आले. मल्लिकार्जुन हायस्कूल मध्ये ५०० हून अधिक टाळकरी ढोल ताशा वादकांनी पारंपारिक दिंडीत शोभा आणली. संगमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आधुनिक आणि पारंपारिकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. तर विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या हातात वारीचे महत्व सांगणारे बोर्ड देण्यात आले होते. सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत नऊशेहून अधिक पुस्तकांची विठ्ठला चरणी भेट देण्यात आली त्यातून सोन्या चांदीपेक्षा शब्दांची राशी तुला वाहतो हा जयघोष देण्यात आला. तर नीलकंठेश्वर प्रशालेत विद्यार्थ्यांनी दिंडी माऊली या गीतावरील नृत्य आणि रिंगण सादर करून कन्ना चौकात जणू पंढरी उभी केली होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. जगदीश पाटील, अश्विनी तडवळकर, रोहित थळवे, दीपक सोमा आणि दिनेश शिंदे यांनी काम पाहिले.
Post Views: 11