पंढरपूर – रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी । पंढरीसी जाता सर्व दु:ख हारी ।।लाखो वारकरी येती, आषाढी कातिर्की । पददर्शन घेता ब्रम्हानंद होई ।। या भावनेतून लाखोंच्या संख्येने आलेल्या वैष्णवांनी आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास उपस्थितराहून या सोहळ्याचा खऱ्या अथार्ने आनंद लुटला.
एकादशी निमित्त चंद्रभागेवर स्नानासाठी वारकऱ्यांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केल्याने चंद्रभागेचा तिर वैष्णवांच्या गदीर्ने अक्षरश: फुलून गेला होता. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सर्व पत्राशेड भरुन स्वेरी महाविद्यालया पुढे गेलेली होती. त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी वारकऱ्यांना कईक तास लागत होते. मुख दशर्नासाठी देखील मोठी रांग लागलेली होती.
दरम्यान वारकरी सांप्रदायातील या कुंभमेळ्या मध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेशमधुन आलेल्या लाखों वैष्णवांनी हा एकादशीचा सोहळा याचि देहि याचि डोळा अनुभवला.आज एकादशी निमित्त चंद्रभागेच्या पवित्र स्नानाची पर्वणी लुटण्यासाठी अगदी मध्यरात्री पासून वारकऱ्यांचे थवेच्या थवे चंद्रभागेकडे जाताना दिसत होते.दशमी दिवशी संध्याकाळी येथे दाखल झालेल्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम, सोपानकाका, एकनाथ महाराज, मुक्ताबाई आदी संतांच्या पादुकांना विठ्ठल विठ्ठल,माऊली माऊलीच्या जयघोषात रथा मधून चंद्रभागा स्नानासाठी वाळवंटात आणल्या जात होत्या. चंद्रभागेच्या पवित्र जलाने पादुकांना स्नान घातले जात होते. या वेळी टाळ मृदुंगाच्या गजरात वैष्णवजनांकडून केल्या जात असलेल्या बोला पुडंडिलक वरदे हरि विठ्ठलच्या जयघोषाने चंद्रभागेच्या वाळवंटाचा परिसरण दणाणून गेला होता. चंद्रभागा स्नाना
नंतर संतांच्या पादुका रथांमध्ये ठेवून ते पालखी सोहळे प्रदक्षिणा मागार्वर नगरप्रदक्षिणेसाठी दाखल होत होते. त्या अगोदर येथील विविध मठ, धर्मशाळांतून उतरलेल्या दिंड्यांनीपहाटे पासूनच नगरप्रदक्षिणेस सुरुवात केलेली होती. ज्या वेळी विविध संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेवरुन मार्गक्रमण करीत होत्या त्या वेळी वारकऱ्यांची पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत होती.
Post Views: 9