पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव बाजारपेठेत व मंगळवारी असणाऱ्या बाजारात सध्या सुट्ट्या पैशांची ( चिल्लरची) प्रचंड टंचाई जाणवत आहे.यामुळे व्यापारी व ग्राहक दोघांनाही मोठा फटका बसत आहे.ग्राहकांकडे 50,100,200,500 रुपयांच्या नोटा भरपूर उपलब्ध आहेत. माञ 5,10 व 20 रुपयांच्या सुट्ट्या पैशाचा तुटवडा जाणवत आहे.पिलीव ही आसपासच्या खेड्यातील मुख्य बाजारपेठ आहे .यामुळे याठिकाणी आसपासच्या खेडयातुन लोक मोठ्या प्रमाणावर येतात.माञ किरकोळ व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या चिल्लरची टंचाई असल्यामुळे दररोज खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तु, भाजीपाला, किराणा,औषध यासाठी आलेल्या ग्राहकांना सुट्ट्या पैशा अभावी तासनतास ताटकळत बसावे लागत आहे.ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे फोन पे ,गुगल पे ,अश्या ऑनलाईन च्या सुविधा नाहीत.तसेच नेटवर्क समस्या यामुळे ऑनलाईन व्यवहार होऊच शकत नाहीत. यामुळे नागरिकांना रोख रकमेवरच अवलंबून राहावे लागते. बऱ्याच वेळा सुट्टे पैसे नसल्याने व्यवहार रद्द करावा लागतो. मंगळवारी पिलीवचा आठवडी बाजार असतो या बाजारात शेतकरी आपला भाजीपाला विक्री साठी आणतात तसेच किराणा माल व इतर सर्वच व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतात तर खरेदीसाठी सर्व सामान्य नागरिकासह, नोकरदार,कामगार, विविध स्तरांतील लोक येतात पण चिल्लरचा प्रचंड तुटवडा पिलीवच्या बाजारात जाणवतो .यामुळे व्यवहारावर मोठा परीणाम होतो.व्यापाऱ्यांना इतर ठिकाणाहून कमिशन देऊन चिल्लर घ्यावी लागते एवढी विदारक परिस्थिती पिलीव बाजारपेठेत व बाजारात पाहवयास मिळते. चौकट _ पिलीव येथील सुप्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी सुरज खलीपे यांना विचारले असता बऱ्याच वेळा ग्राहक खरेदी करतात माञ चिल्लर नसल्यामुळे व्यवहार रद्द करावा लागतो. चौकट _ पिलीव येथील मंगळवारी आठवडी बाजार असतो.या बाजारात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करतो .माञ अलीकडे चिल्लरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.यामुळे खरेदी विक्रीवर मोठा परीणाम होतो.चिल्लर अभावी अनेक ग्राहक व्यवहार रद्द करतात, सभाष जाधव,भाजीपाला व्यापारी, कुसमोड.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















