बार्शी – आषाढी एकादशीच्या पारंपारिक धार्मिक भागवत सांप्रदायिक शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत पिंपळगाव व पंचक्रोशीतील बार्शीतील श्री भगवंताचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या समस्त भाविक गावकऱ्यांच्या पायी चालत जाणाऱ्या दिंड्यांना जन्मभूमी प्रतिष्ठानच्यावतीने उपहासाचे फराळ व फलाहाराचे वाटप करण्यात आले.
जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सत्कार्यांची मालिका पुढे नेत आज आषाढी एकादशीनिमित्त जन्मभूमी ग्रामविकास आघाडीचे प्रमुख पै. सचिन धस, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब पाटील, प्रवक्ते सुरत चंदनशिवे, राहुल धस, शिव मंदिर पुजारी धनाजी चव्हाण, महादेव मस्तूद, समाधान पवार, राम गरड, गणेश पवार, सोहेल शेख, राजेंद्र लोमटे, नारायण पवार आदी मान्यवरांनी बार्शीला पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील भाविकांना उपवासाच्या अल्पोपहाराचे वाटप केले.
श्रावण महिन्यामध्ये गावात साकारत असणाऱ्या पुरातन शिव मंदिराचे पूर्ण जर्णोद्धार व नूतनीकरण झाले असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकर श्रावण महिन्यात हे भव्य शिवालय भाविकांच्या सेवेत सादर होणार असल्याची माहिती जन्मभूमी प्रतिष्ठानने यावेळी दिली.
Post Views: 11