अक्कलकोट – एक आदर्श धर्मादाय संस्था न्यास कसे असावे याचा मापदंड श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी घालून दिला आहे . श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लिला कार्याने पावन झालेली अक्कलकोट तीर्थक्षेत्र भुमी धार्मीक पर्यटनामुळे संपूर्ण जगात नावारूपास आली . तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दररोज हजारो भाविकानां व उत्सव काळात लाखो भाविकाना मोफत महाप्रसाद अन्नदान सेवेचा पाया संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी रचला . तर गरीब आनाथ व्याधीग्रस्तानं घरपोच जेवण हा उपक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी चालु करून यावर कळस चढविण्याचे कार्य केले आहे .ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस ही उक्तीची आठवण यामुळे होते . . संस्थापक अध्यक्ष जनमेयजयराजे भोसले यांच्या कार्याबद्दल स्वर्गीय गान कोकीळा लता मंगेशकर छत्रपती शिवाजी महाराज चरित्राचे ख्यातनाम व्याख्याते प्रा नितीन बानगुडे पाटील राष्ट्रीय प्रबोधनकार किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी गौरवोद्गार काढले आहेत . यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धार्मिक सामाजिक वैदयकीय पर्यावरण विषयक शैक्षणिक क्रीडाविषयक राष्ट्र जडणघडणीत जे उपक्रम राबवित आहे याची अक्कलकोटच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ऐत्यासिक नोंद होईल यात तिळमात्र शंका नाही . श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी एक इतिहास रचला आहे . ध्येयप्राप्ती होण्यासाठी त्या कामाप्रती झोकून द्यावे लागते त्या कार्यासाठी वेडे व्हावे लागते आणि ध्येयवेडया माणसा कडूनच इतिहास घडविला जातो . असाच इतिहास रचला संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी … आज अन्नछत्र मंडळाची ख्याती जगात साता समुद्रा पार गेली आहे . अचानकआपल्या घरात दोन माणस पाहुणे जास्त आली तर तारांबळ उडते येथे रोज लाखो भाविक महाप्रसाद घेऊन तृप्त होतात .
!
. जे का रंजले गांजले । तोसी म्हणे जो आपुले ।
देव तेथेची जाणावा ! महाराष्ट्र ही संताची भुमी येथे अनेक साधु संत महात्मे होऊनी गेले . आज आपण संताच्या आचार विचार अनुकरणाने त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहोत . असेच संताच्या अनेक विचारान आचारान भारलेले वेळप्रसंगी नाठाळाशी मारू काठी प्रसंगी एखाद्या च्या मदतीसाठी धाऊन जाणारे पाठीशी खंबीरणे उभे राहणारे जनमेजयराजे भोसले १९८८ साली अंत्यत प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपल्या घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत ध्येय वेड्यासारखे झपाटल्यागत कष्ठ सोसले .स्वामी भक्ताना मोफत महाप्रसाद भोजन मिळावे या उद्देशाने अवघ्या तीन किलो तांदळावर अंत्यंत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अन्नदान महाप्रसाद सेवा सुरु केली . त्यांचे ध्येय उदात्त अंत्यत कल्याणकारी होते अन. साक्षात श्री स्वामी समर्थच अन्नछत्र मंडळाच्या पाठीशी उभे राहिले ! . स्वामी भक्तानां मोफत महाप्रसाद मिळावा हा उदात्त हेतु सफल झाला . . आज श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रोज हजारो भक्तानां उत्सव काळात लाखो भक्तानां सळाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस मोफत महाप्रसाद दिला जातो .मोफत महाप्रसाद देण्याच्या कार्याचा प्रारंभ पाया रचण्याचे काम संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी केल . तर यावर कळस चढविला ते श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी . जे कोणी एखाद्या व्याधीने रंजले आहेत गांजले आहेत अनाथ आहेत . उदरनिर्वाह करू शकत नाहीत अशांना मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी आपलेस केल . त्यांना दया दाखविली . स्वामी भक्ताना देण्यात येणारा महाप्रसाद भोजन हेच भोजन रोज डब्यामध्ये अंत्यत गरीब गरजुनां अनाथांना घरपोच दिला जातो तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये कोणी गरीब अनाथ उपाशी राहु नये याची दक्षता श्री स्वामी समर्थ मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी घेतली आहे . म्हूणून म्हणावेसे वाटते की जे का रंजले गांजले । तोसी म्हणे आपुले देव तेथेची जाणावा ! आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर त्याची व्यवस्था करताना आपली . फारच तारांबळ होते स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रोजच स्वामी भक्त येतात . या साऱ्यांची मोफत महाप्रसाद सेवेची सोय करणे म्हणजे हा स्वामी समर्थाचा चमत्कारच आहे . हजारो नव्हे तर उत्सव काळात लाखो स्वामी भक्तांना कुठल्याही प्रकारची कमतरता न भासवता हे अन्नदाना चा मोठा यज्ञ चालु आहे . याकरिता मोठी दानतही लाकते उदारताही लागते स्वामी भक्त उदार हातानी देतात . हे सर्व करून आणण्याची मानसिकता हवी . जगात अब्जोधिश लोक आहेत पण दानत साऱ्याकडेच आहे असे होत नाही . मोठी दानतही असावी लागते ही मोठी दानतही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे यांच्या जवळ आहे . श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यास राष्ट्र उभारणीत जडण घडणीत मोठे योगदान देत आहे . युवा पिढी बलवान तर राष्ट्र बलवान होईल ही उक्ती प्रमाणे मंडळाने युवकासाठी बंदिस्त जिम उभारले खुले जिमही उभारले आहे एवढेच नव्हे तर सृदृढ राष्ट्र निर्मीतीसाठी युवक सुदृढ बनविण्यासाठी पुढाकार घेतला . तालुक्यतील कुस्तीगिराना खुराक देऊन सुदृढ केले या कुस्तीगिरामध्ये स्पर्धा घेतली . प्राविण्य मिळविलेल्या कुस्तीगिराना स्पर्धेमध्ये नैपुण्यासाठी प्रोत्साहन दिले . पोशख खुराक मध्ये सातत्य ठेवले . कुस्तीगिरासाठी विशेष लक्ष देऊन युवा पिढी याकडे आकर्षित होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी निरंतर कायम ठेवले आहे . या कुस्तीगिरांचे पालकत्वच मंडळाने घेऊन महाराष्ट्रातील लोप पावत असलेला खरा मैदानी खेळ कुस्ती जिंवत ठेवण्याच कार्य अमोलराजे भोसले यांनी केल आहे . . कोवीड काळात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने केलेल्या कार्याला तोडच नाही . मंडळाने कोवीड काळात सर्व इमारती कोवीड सेंटरला दिल्या . अंत्यत गरजुना मंडळाने शिजवलेले जेवणाचे अन्न व शिधा ही पुरविले . जीवनावश्यक वस्तूचे किट वाटपही केले .
चोकट
> कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचे शिवचरित्र व्याख्याते प्रा .
Post Views: 13