Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

तरुण भारतbyतरुण भारत
July 31, 2026
in solapur
0
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २२ वा वर्धापन दिन अत्यंत ऐतिहासिक ठरत आहे. यंदाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग फॅकल्टीचे बी.टेक. पदवीचे ९ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. या भागातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होतो. विद्यापीठाने काळाची गरज ओळखून आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर विशेष भर दिला असून, हे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला आहे.

 

​विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘तरुण भारत’शी बोलताना कुलगुरूंनी विद्यापीठाच्या आगामी विकासकामांचा आणि शैक्षणिक धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, ​आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षारक्षणासह बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी हे आठ नवीन आणि एक जुना कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी असा हा ९ अभ्यासक्रमांचा गट आहे. सोलापुरात लवकरच आयटी हब येत असून, या निर्णयामुळे सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी इतर शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. विशेषतः एआय, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीसारख्या जागतिक मागणी असलेल्या विषयांचे शिक्षण आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. यासाठी स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ युजी अंतर्गत स्वतंत्र स्कूल डायरेक्टरची नियुक्ती केली जात आहे.

——

​नवीन प्रशासकीय इमारत व पायाभूत सुविधांचे स्थलांतर

 

​नवीन प्रशासकीय इमारतीतील मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रत्यक्ष वापर केल्याशिवाय अडचणी समजणार नाहीत, या हेतूने आम्ही तेथे स्थलांतरित होत आहोत. विद्यापीठाच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी मल्टिपर्पज हॉलचा वापर लवकरच सुरू करण्यात येणार असून, यासाठी प्रशासकीय इमारतीपासून मल्टिपर्पज हॉलपर्यंत अंतर्गत रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. याशिवाय पीएम उषा अंतर्गत ५ इमारतींचे बांधकाम सुरू असून तेथील अंतर्गत रस्तेही लवकरच सुरू केले जातील. ज्या अभ्यासक्रमांना प्रॅक्टिकल लॅबची आवश्यकता नाही, अशा काही अभ्यासक्रमांचे वर्ग या नव्या इमारतींमध्ये लवकरात लवकर स्थलांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

———-

 

​विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात बससेवा आणि ॲम्बुलन्सची सोय

​विद्यापीठाकडे सध्या दोन बसेस उपलब्ध आहेत. यासाठी प्रिसिजन व बालाजी अमाईन्स या कंपन्यांचे सहकार्य लाभले. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातील रंगभवन ते नवीन कॅम्पस तसेच जुन्या कॅम्पसपासून नवीन कॅम्पसपर्यंत अत्यंत अल्प शुल्कात वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्धापन दिनापासूनच याची सुरुवात करण्यात येत असून, आणखी दोन बसेस व ॲम्बुलन्ससाठी आम्ही विविध एनजीओंकडे मागणी केली आहे.

——

 

​एनईपीची अंमलबजावणी आणि पीजी अभ्यासक्रमांचे नियोजन

 

​राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पोस्ट ग्रॅजुएशन अभ्यासक्रम हे एक वर्षाचे असणार आहेत, ज्यामुळे शिक्षकांचा वर्कलोड काहीसा कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, बीएससी बरोबरच बीए आणि बीकॉम हे पदवीचे अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सुरू करण्याचा आमचा मानस आहे. युजी अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतरच विद्यापीठाला आगामी काळात पीजी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी सहज उपलब्ध होऊ शकतील.

——–

 

​वसतिगृहे, गुरुकुल पद्धती आणि ‘बालाजी उद्यम केंद्र’

 

​विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थी कायम राहावेत यासाठी ५०० मुले आणि ५०० मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कॅम्पसमध्ये एक हजार ते बाराशे विद्यार्थी राहू शकतील आणि याद्वारे ‘गुरुकुल पद्धती’ची शिक्षण प्रणाली आपल्याला पुढे राबवता येईल. तसेच स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या इमारतीसाठी निधी मिळण्याबाबतचा प्रस्तावही शासनाला सादर केला आहे. ​याशिवाय, बालाजी अमाईन्स फाऊंडेशनने २० हजार चौरस फुटांचे बांधकाम करून देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘बालाजी उद्यम केंद्र’ म्हणून अस्तित्वात येणाऱ्या या इमारतीचा उपयोग कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी केला जाईल, ज्याचा फायदा स्कूल लेव्हलचे विद्यार्थी व शिक्षकांना होईल.

——

​तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र ‘सेंटर’चा मानस

 

​तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका स्वतंत्र इमारतीची निर्मिती प्रस्तावित आहे. या सेंटरमध्ये ३० ते ३५ जणांना राहण्याची, जेवणाची आणि समुपदेशनासाठी (कौन्सिलिंग) आवश्यक ती सर्व सोय केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही एनजीओंच्या मदतीने प्रयत्न करत आहोत.

Post Views: 10
Previous Post

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next Post

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

July 31, 2026
कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

July 31, 2026
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

July 31, 2026

एका कर्मचाऱ्याच्या वर्षभरात तीन बदल्या; जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

July 31, 2026
सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

July 31, 2026
वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

July 31, 2026
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

July 31, 2026
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

July 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1015957

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!