अकलूज – गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किर्तन रत्नाकर परंपरेचे अध्वर्यू, सद्गुरू ज्ञान भास्कर ष. ब्र. १०८ श्री. महादेव शिवाचार्य महाराज, मठ वाई यांनी वाई येथील मठात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात विजय भैय्या मिरगे वेळापूर यांची राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली.
गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या आशीर्वचन कार्यक्रमात सद्गुरूंनी ही निवड जगजाहीर केली.यावेळी त्यांनी धर्म, अध्यात्म, कीर्तन परंपरा आणि समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम व कार्यक्षम कार्यकर्त्यांची गरज असल्याचे सांगत विजय मिरगे यांच्यावर राज्य प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली.श्री. विजय भैय्या मिरगे हे सामाजिक, धार्मिक आणि जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यांनी सातत्याने योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
नियुक्तीनंतर विजय भैय्या मिरगे यांनी सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत, किर्तन रत्नाकर परंपरेचा विचार, भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि धर्मप्रबोधनाचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी निष्ठेने व समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे वेळापूर परिसरासह सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध मान्यवर, भाविक आणि हितचिंतकांनी मिरगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 23