बार्शी – या घटनेत, यातील फिर्यादी हा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामपंचायतच्या सचिवाल्यासमोरुन येत असताना फिर्यादीच्या गावातील तिन्ही आरोपी मिळून आले व तू आम्हाला शिव्या का दिल्या होत्या म्हणून आरोपी नं १ हा फिर्यादीच्या आंगावर धावून आला आणि म्हणाला तु लय माजला आहे, तुझा खुन करतो असे म्हणून फिर्यादीच्या डाव्या हाताला धरले आणि गालात चापट मारली, तेवढ्यात फिर्यादीचा मुलगा हा तिथे आला तेव्हा तिन्ही आरोपीं फिर्यादीला मारहाण करत होते म्हणून त्यांचा मुलगा मध्ये पडला. त्यावेळी त्यांनी फिर्यादीला व त्यांच्या मुलाला चप्पलाने व लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपीच्या तावडीतून सुटका करुन घेत असताना आरोपीने नं १ ने फिर्यादीच्या डाव्या हाताला चावा घेवुन जखमी केले व उजव्या हाताला आरोपी नं २ ने दाताने चावा घेवुन जखमी केले व आरोपी नंबर ३ ने लाथा बुक्याने पाठीत मारहाण केली. म्हणुन आरोपी विरुद्ध भा.द.वि.कलम ३२४, ३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे तपासलेले साक्षीदार यांचा पुरावा आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुरेसा नाही व आरोपी विरुद्ध सबळ पुराव्याच्या अभाव असल्याबाबत युक्तिवाद ॲड. एस.एम.गुंड यांनी केला. सदर प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सदर आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणी यात आरोपीच्यावतीने ॲड. एस एम गुंड व ॲड. व्ही.पी जाधव,ॲड. आर. आर. घोडके, ॲड. ए. एस. गुंड यांनी काम पाहिले
Post Views: 21