सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) प्रक्रियेला वेग आला असून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५५.०८ टक्के शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ५९ हजार ८५१ शेतकर्यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी २६ हजार २५२ खात्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. यातील १४ हजार ४५९ खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आणखी ११ हजार ७८४ खात्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे.



















