भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त तसेच भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त (दि.09) धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दोन्ही दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करण्यात येऊन स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना अभिवादन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक दिशा दिली. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृती जागवित स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त युवक काँग्रेसची संघटनात्मक बैठक देखील घेण्यात आली. युवकांची ऊर्जा, संघटनाची ताकद आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यांच्या माध्यमातून काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्याचा निर्धार युवक काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. युवक काँग्रेस ही पक्षाची महत्त्वाची संघटनात्मक शक्ती असून, युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांना संघटित करून लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासोबत खलील सय्यद,प्रशांत पाटील,शिवाजी गायकवाड, मनीषा वाघमारे, विनोद वीर,मेहबूब पटेल,धनंजय राऊत, हरिदास शिंदे, वसंत मडके, जयसिंग पवार,गोरोबा झेंडे,अशोक बनसोडे,ॲड. गणपत कांबळे, शिवानंद तोरकडे,विलास शाळू,सरफराज काझी,अंकुश पेठे, अभिमान पेठे, ॲड.राजुदास आडे,बाबा मोमीन,प्रभाकर लोंढे,गणेश पवार,राजेंद्र राऊत, संजय गजधने,धवलसिंह लावंड,संकेत पडवळ, पोपट शिंदे, बालाजी राठोड, मन्सूर सय्यद,जीवन चौगुले, तानाजी जाधव, धीरज सोनवणे, हनुमंत सांगवे, बसवराज पाटील, दिलीप पवार, माणिक ढोबळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते युवक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 7