सोलापूर – अस्मिता खेलो इंडिया पुणे विभागीय वुशू लिग स्पर्धेत सांन्सू प्रकारात सोलापूर शहरने विजेतेपद पटकाविले. सोलापूर ग्रामीणने दोन प्रकारात उपविजेतेपद मिळवले.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन यांच्या मान्यतेने व वुशू असोसिएशन ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट यांच्या सहकार्याने राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटाची स्पर्धा पार पडली. याचे उद्घाटन क्रीडा अधिकारी नदिम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना ग्रँडमास्टर युवराज गायकवाड, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख बार्शी प्रमुख शितल मांजरे पाटील, महापालिका क्रीडा अधिकारी नजिर शेख, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, भारतीय नोसेना अधिकारी स्पर्धा आयोजक फुलचंद जावळे, सचिव माधव शेरीकर यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
स्पर्धेचे मानकरी – ताऊलू : प्रथम : टीम पुणे शहर (शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता तृप्ती चांदवडकर आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरज उकीरडे, तेजस राऊत).
द्वितीय: सोलापूर ग्रामीण (माधव शेरीकर सर, अशोक भोसले).
तृतीय : टीम दिलीप शिंदे व रितेश शिंदे.
सांन्सू : प्रथम : सोलापूर शहर ( सम्राट गायकवाड, किशोर चंदनशिवे, अभिजीत गायकवाड ).
द्वितीय : सोलापूर ग्रामीण (फुलचंद जावळे, पांडुरंग कुदळे, दिपाली खेरनार जिजामाता कन्या प्रशाला बार्शी.).तृतीय : पुणे शहर
——-
Post Views: 7