शुक्रवार दिनांक १४/८/२०२६ रोजी कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत मा. मुख्याध्यापिका सौ. सीमा कोरवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली **नागपंचमी* अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. मा. मुख्याध्यापिका सौ. सीमा कोरवलीकर यांच्या हस्ते नागदेवतेचे पूजन करण्यात आले. सौ. स्वाती मोहरे यांनी ‘नागपंचमी आपण का साजरी करतो.’ याबाबत माहिती सांगितली. सौ.श्रुती कुलकर्णी यांनी नागपंचमीची गाणी गायिली. त्यावर सर्व शिक्षिकांनी व विद्यार्थिनींनी फेर धरला. झिम्मा- फुगड्या खेळत सर्व विद्यार्थिनींनी नागपंचमीचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांना लाह्या प्रसाद वाटण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. स्वाती मोहरे यांनी केले.
Post Views: 68