सोलापूर – अशोक चौक येथील बोल्ली मंगल कार्यालयात नागपंचमी निमित्त पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाच्या वतीने आयोजित महिला उद्योजकांचे प्रदर्शन व विक्री दि. 14,15,16 ऑगस्ट 2026 या दरम्यान दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
या मेळाव्याचे शुभारंभ दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी तेलगु सिने अभिनेत्री आरोही यांच्या शुभहस्ते पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या मेळाव्यात मार्गदर्शन करणार सर्व मान्यवरांनी महिला उद्योजकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ह्या मेळाव्याचे आयोजन केले अजून सर्व महिलांना संधी उपलब्ध करण्यात आले आहे. सर्वांना या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचे प्रमोशन करावे असे आव्हान केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे महिला अध्यक्षा कुमुद अंकारम, नगरसेवक अजय पोनम, प्रधान सचिव वासुदेव इप्पलप्पल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामडयाल, जेष्ठ पत्रकार दशरथ वडतीले, सामाजिक विभाग अध्यक्ष अशोक, बिटला सचिव रामगोपाल म्याकल, महिला उपाध्यक्ष विद्या सिंघम, सचिव कल्पना आर्षनपल्ली, विशेष निमंत्रक सदस्य रेणुका बुधारम, युवक विभागाचे
विश्वास गज्जम आदी उपस्थित होते.
























