सोलापूर : श्री जिव्हेश्वर युवक-युवती मंडळ, सोलापूर यांच्या वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य चित्रकला स्पर्धा आज, रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत फडकुले सभागृह (श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ), सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
गेल्या ४५ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या स्पर्धेला यंदाही विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावर्षी ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेचे व चित्रकलेतील कौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे हास्यसम्राट श्री दिपक देशपांडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री परमेश्वर गदगे (अध्यक्ष, स्वकुळ साळी विणकर समाज, सोलापूर), सौ. कलावती आनंद गदगे (नगरसेविका), श्री उमेश गायकवाड (युवक अध्यक्ष, श्री जिव्हेश्वर युवक-युवती मंडळ) आणि सौ. मयुरी सपकाळ (युवती अध्यक्षा, श्री जिव्हेश्वर युवक-युवती मंडळ) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ऍड ज्ञानेश्वर डिंगणे आनंद कोंगे, ज्ञानेश्वर एडके, अनिल दिवटे,प्रवीण कापसे, यशवंत एकबोटे, अमर सपार,श्रीनिवास उकरंडे तसेच मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चित्रकला स्पर्धेचे नियोजन व आयोजन श्री अरुण पोरे सर आणि शुभम येडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, मान्यवर, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री जिव्हेश्वर युवक-युवती मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
Post Views: 7