सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना ‘ब्रिगेडियर’ पदवी बहाल करण्यात आल्याबद्दल, सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांत रेंबर्सू, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा व मुकुंद जाधव, खजिनदार संतोष बडवे, चेअरमन राजेंद्र गोटे, सदस्य राजु रंगम, माजी सिलेक्शन कमिटी चेअरमन के. टी. पवार, निलेश गायकवाड, प्र-कुलगुरू दामा, विधी अधिकारी जावेद खैरादी आणि आनंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. बसवराज सलगर यांनी केले. संजय वडजे यांनी आभार मानले.





















