सोलापूर : आयसीआयसीआय बँकेत कामगारांच्या भविष्य निर्वाण निर्वाह निधीसह तीस कोटीच्या ठेवी ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेऊन दोन महिने उलटली तरी संबंधित बँक ठेवल्या नसल्याची बाब नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांच्या लक्षवेधीमुळे उघडकीस आली. बँकेत ठेवी ठेवण्यास विलंब झाल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे. बुधवारी तत्काळ या सदर्भात निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सभागृहात दिले.
सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सायंकाळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाईतील कथित कंत्राटातील भ्रष्टाचार प्रकरणातील चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर झाला आहे का ? याकडे लक्ष वेधले. या प्रकरणातील अहवाल प्राप्त झाला असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेतील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी सह तीस कोटीचा ठेवी बंधन बँक ऐवजी आयसीआयसी बँकेत ठेवण्याचा निर्णय 2 महिन्यापूर्वी महापालिका स्थायी समितीमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार त्या ठेवी संबंधित बँकेत ठेवल्या आहेत की नाही ? अशी लक्षवेधी शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी मांडली. दोन महिने झाले तरी ही रक्कम जैसे थे आहे. विलंब झाल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसणार आहे. तातडीनेही रक्कम ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्याचे सात टक्के प्रमाणे सुमारे ३० लाखाचा फटका बसणार आहे. या रकमेवरील ७ टक्के व्याज बुडणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. ठेवी ठेवण्यात आले नाहीत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत खुलासा करण्यासाठी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेविका तथा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी खुलासाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत दुजोरा दिला. महापालिका आयुक्तांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सभागृहापुढे खुलासा केला. टीव्ही ठेवण्यासंदर्भात बुधवारी निर्णय घेण्यात येणार आहे मात्र तूर्तास सेविंग खात्या अंतर्गत साडेतीन टक्के व्याज या ठेवींवर मिळत आहे, असे डॉ. जवळगेकर म्हणाले.
दरम्यान, गेली दोन महिन्यापासून या ठेवी अद्याप स्थायीच्या निर्णयानुसार ठेवण्यात आल्या नसल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
Post Views: 43