सांगोला – सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई यांना रेल्वेच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये नागपूर-गोवा वास्को-दि-गामा एक्सप्रेस रेल्वे लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, बेळगाव, लोंढा, मडगाव मार्गे सुरू करण्यात यावी, सांगोला-शेगाव एक्सप्रेस (गजानन महाराज मंदिर) रेल्वे, सकाळी सत्रात कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात, दादर-सातारा-दादर रेल्वे दररोज सोडावी, सांगोला रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटरची सुविधा करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने आज दि.१९ ऑगस्ट रोजी पुणे येथे सर्व खासदारांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वच खासदारांनी आपापल्या भागातील प्रलंबित रेल्वे गाड्या सुरू करणे, थांबे देणे व भौतिक सुविधा निर्माण करणे या समस्येप्रश्नी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सातत्याने करणे आवश्यक आहे, आजच्या बैठकीत प्रलंबित मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी प्रवाशांची मागणी जोर धरत आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी यावेळी दिली.
Post Views: 17