सोलापूर – माढा तालुक्यातील लऊळ येथील गट नं. ३१२ मधील शेतजमीनीची मोजणी व हद्दखूण कायम करण्यासाठी येत्या २८ ऑगस्ट २०२६ रोजी मोजणी होणार आहे. या मोजणीच्या वेळी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, अर्जदार महिला शेतकऱ्याने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
लऊळ (ता. माढा, जि. सोलापूर) येथील निवासी श्रीमती गुलशाद खाजोद्दीन पठाण यांच्या मालकीची शेतजमीन गट नं. ३१२ मध्ये आहे. उप अधीक्षक भूमी अभिलेख माढा यांच्या कार्यालयाकडील नोटीसनुसार या जमिनीची मोजणी २८ ऑगस्ट २०२६ रोजी ठरवण्यात आली आहे.
धोक्याची शक्यता व बंदोबस्ताची मागणी:
सदर जमिनीच्या मोजणीदरम्यान आजूबाजूच्या पक्षांकडून जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोजणीच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने एक महिला पोलीस आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी असा सशस्त्र पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. यासाठी लागणारे सर्व शासकीय शुल्क भरण्यास तयार असल्याचेही अर्जदाराने स्पष्ट केले असून, यासंदर्भातील अर्ज पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
——-




















