सोलापूर – स्वतःच्या शेतात काम करीत असताना सर्पदंश झालेल्या एका 32 वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मृत्यू झाला.
खाजासाब पैगंबर कसाई (वय 32 वर्ष, रा. गुब्बेवाढ, तालुका इंडी, जिल्हा विजापूर ) असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तो 12 ऑगस्ट रोजी सकाळी येथील स्वतःच्या शेतात उडीद पिकावर फवारणी करीत असताना त्याला सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्याला अगरखेड येथील आरोग्य केंद्राचा प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात रेवण्णा कसाई यांनी दुपारी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला.
Post Views: 12