सोलापूर : एका ४२ वर्षीय विवाहित महिलेच्या प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय अविवाहित तरुणाचा लाकूड, वायर आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण करून खून केल्याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधित महिले चा पती व मुलाला अटक करण्यात आली आहे.
अरविंद बाळू मस्के (वय २७, रा. तरटगाव, जि. सोलापूर) असे खून झालेल्या त्या तरुणाचे नाव आहे
विशाल वडणे व ओंकार विशाल वडणे(दोघे राहणार माळुंब्रा, तालुका तुळजापूर) अशी त्या आरोपी बाप व मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मृत अरविंद याची आई रुक्मिणी बाळू मस्के(राहणार तरडगाव, उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील मयत अरविंद व आरोपी विशाल याची पत्नी मध्ये अनेक महिन्यापासून प्रेम संबंध होते. याच कारणातून १५ ऑगस्ट रोजी आरोपींनी अरविंदला माळूंब्रा गावाजवळील हायवेवर गाठले. आरोपी विशाल वडणे आणि ओंकार वडणे यांनी इतर साथीदारांसह मिळून अरविंदला झाडाला बांधून तसेच लटकवून लाकूड, वायर व हाताबुक्क्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या अरविंदला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने येथील शासकीय रुग्णालयात १०८ ॲम्बुलन्सद्वारे दाखल केले होते. मात्र, संपूर्ण शरीरावर गंभीर दुखापती असल्याने गेल्या आठवडाभरापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता उपचारादरम्यान अरविंद याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, गंभीर स्वरूपाचा अत्याचार असे विविध कलमांतर्गत वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघा बाप मुलाला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर नरसप्पा पाटील हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 13