बार्शी – जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रमांतर्गत ‘माझे स्वप्न, माझे ध्येय आणि यश’ या विषयावर प्रेरणादायी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रवी क्लासेसचे संचालक मधुकर डोईफोडे आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष नवनाथ गुल्हाने सर यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवत शिक्षण, मेहनत, शिस्त, ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार आणि सातत्य यांचे महत्त्व प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, उत्साह आणि यशस्वी होण्याची नवी उमेद निर्माण झाली. याप्रसंगी रामराजे ताकभाते यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सचिव वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा, ध्येयाला बळ आणि यशासाठी प्रेरणा देणारा हा विशेष उपक्रम जिजाऊ गुरुकुलच्या संस्कारक्षम व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल ठरला.
Post Views: 46