Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

TATAच्या गाड्यांमध्ये सोलापूरच्या इंजिनिअरचा पार्ट असणार, 13.5 कोटी रुपये मोजत पेटंटची खरेदी….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 6, 2023
in solapur
0
TATAच्या गाड्यांमध्ये सोलापूरच्या इंजिनिअरचा पार्ट असणार, 13.5 कोटी रुपये मोजत पेटंटची खरेदी….
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : युवा संशोधक आणि इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्याना कल्पना सुचली. यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला.त्यांच्या या पार्टमुळे गाड्यामधील होणारे प्रदूषण आता कमी होणार आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल बुऱ्हाणपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रतिकूल परिस्थितीत राहुलची उंच भरारी

राहुल बुऱ्हाणपुरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं पदवी प्राप्त केली. वडील साडीच्या दुकानात कर्मचारी तर आई गृहिणी अशी घरची स्थिती असतानाही जिद्दीनं राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्याना कल्पना सुचली. राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात एम.सी.व्ही.सी ऑटोमोबाईल क्षेत्रात शिक्षण घेतले. संजय कुरनूरकर, संपत कुमार झळके या शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभलं.

टाटा कंपनीला पार्ट दिला

राहुल बुऱ्हाणपुरे यांना तीन ते चार कंपन्यांनी संपर्क साधला आणि या पेटंटची मागणी केली होती. टाटा मोटर्स कंपनी ही देशी कंपनी आहे आणि टाटा कंपनीचं देश कार्यात नेहमीच अधिक योगदान असतं म्हणून याच कंपनीला त्यात राहुल बुऱ्हाणपूरे यांनी आपलं पेटंट दिलं आहे .

प्रदूषण नियंत्रण करणारा पार्ट तयार केला

सध्याच्या वाहनांमध्ये इ.जी.आर सिस्टमचा वापर केला जातो. या पार्टचं काम प्रभावीपणे होण्यासाठी पीसीएम या सेंसरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. सायलेन्सर मधून बाहेर फेकली जाणारी ३० टक्के प्रदूषित हवा या पार्टमुळे पुन्हा रिसायकल होऊन इंजिन मध्ये सोडली जाते. यामुळे प्रदूषणात ३० टक्के एवढी घट होईल, याशिवाय इंधनाची ही १० टक्के बचत होते, असं राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सांगितलं.

नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायू चार चाकी वाहनांमधून उत्सर्जित होतात. त्यातील नायट्रोजन ऑक्साईड हा मानवी शरीरावर घातक असतो. टाटा मोटर्स कडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार आहे.पत्रकार परिषदेत उद्योगपती किशोर चंडक, शिक्षक संपत झळके अतुल बावटणकर ,बसवराज बऱ्हाणपुरे, माऊली झांबरे, चन्नवीर चिटे आदी उपस्थित होते.

Post Views: 118
Previous Post

सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच; MPSCचा अभ्यास करणाऱ्या बीडच्या तरुणाचा भयंकर शेवट…..

Next Post

गडकरींनी केली “नात कावेरीसाठी” वाढदिवसाची खरेदी…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गडकरींनी केली “नात कावेरीसाठी” वाढदिवसाची  खरेदी…..

गडकरींनी केली "नात कावेरीसाठी" वाढदिवसाची खरेदी.....

ताज्या बातम्या

संध्या धर्माधिकारींच्या बेर कथासंग्रहाला शासकीय कर्मचारी अधिकारी पुरस्कार.#public #पुरस्कार #viral

February 28, 2026

श्री १००८ जगद्गुरु रेणुकाचार्यांची जयंती १ मार्च रोजी होणार साजरी. #public #marathinews

February 28, 2026

ड्रोनची व्याप्ती वाढणार कुलगुरू दामा.#public #marathinews #maharashtranews #breakingnews

February 28, 2026

आई बाबा झोपेतच गेले .. मुलींनी घाबरून आजोबांना फोन केला… #public #viral #marathinews #solapurnews

February 28, 2026

पावडर टाकून मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात#public #solapurnews #marathinews

February 28, 2026

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

February 28, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

February 28, 2026

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0709196

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697