बार्शी – जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमनी ॲपच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादीशी ओळख निर्माण करुन वारंवार फिर्यादीला भेटायला संभाजीनगर येथे बोलवून तिच्यासोबत संबंध ठेवले, तसेच संबंध प्रस्थापित करुन स्वतःचे व संबंधित महिलेचे प्रायव्हेट फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप असलेल्या आरोपीविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७७, ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ इ, ६७, ६७ अ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर त्याचा जामीन अर्ज न्यायालयासमोर दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे, प्रकरणातील कागदपत्रे व उपलब्ध परिस्थितीचा विचार करुन तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुराव्याच्या अभाव असल्याबाबत युक्तिवाद ॲड. अनिकेत गुंड यांनी केला. सदर प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सदर आरोपीची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणी यात आरोपीच्यावतीने ॲड. अनिकेत सहदेव गुंड यांनी काम पाहिले.
Post Views: 22