पंढरपूर – अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कॉरिडॉर बाधितांशी चर्चा केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाची व त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच प्रशासनातील विविध मान्यवर अधिकारी यांची समवेत सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी खास बैठक गुरुवार दि.२७ऑगस्ट रोजी संपन्न झाली. तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने रामकृष्ण वीर महाराज यांनी वीस ते पंचवीस मिनिटे अत्यंत प्रभावी भाषण करून अनेक मुद्द्यांचा ऊहापोह करून विरोध दर्शविला तसेच आपण दिलेल्या पर्यायी आराखड्यातील महत्त्वाचा भाग सांगितला त्यानंतर अभयसिंह इचगावकर , भाजप महिला आघाडी सचिव डॉक्टर प्राजक्ता बेणारे ह. भ. प. राठी महाराज,गणेश लंके व्यंकटेश गलगलकर, पत्रकार महेश खिस्ते यांनी विविध मुद्द्यांचा उहापोह केला. ठाम पण संयमी स्वरात विरोध दर्शविला.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून तुमच्या सर्वांच्या मागण्यांचा निश्चित विचार करेन याही पुढे तुम्ही अशा सूचना करत जावा असे सांगितले,वीर महाराजांनी चांगल्या पद्धतीचा आराखडा सादर केला आहे असे उद्गार काढले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून निरोप घेण्यात आला. याप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल , जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन , माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , पंढरपूर चे आमदार समाधान अवताडे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांत सचिन इथापे यांचे सह महाराष्ट्र शासनातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सत्कारात माननीय मुख्यमंत्री महोदयांना शाल ,पेढे ,ग्रंथ यासह हिंदू महासभेचा सावरकर रचित कुंडलीनी कृपानांकित भगवा ध्वज भेट देण्यात आला. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचा डंका मुंबईत दुमदुमला.
Post Views: 25