बार्शी – बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 10,11 BNS कायद्या अंतर्गत कलम 64,65,137(2), 3(5)आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कलम 4,6,8,12,17 अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या रोहन रवी शेंडगे या पतीला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.काही महिन्यांपूर्वी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दि. १० जून २६ रोजी गुन्हा रजिस्टर नं १८१/२०२६ दाखल करण्यात आला होता. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पतीसह अन्य काही जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) कारवाई केली होती. यात आरोपी पती न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज ऍड. विशाल गोणेकर यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपी पतीला काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला. याकामी आरोपीच्यावतीने ऍड. विशाल गोणेकर, ऍड. अमोल अलाट, ऍड. पांडुरंग घोलप यांनी काम पाहिले.
Post Views: 38