सोलापूर – जिल्हा परिषद मराठी शाळा, गवंडी वस्ती येथील क्रीडा शिक्षक शिवाजी वसपटे यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक व ग्लोबल ह्युमन रिसर्च अँड वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील पंचवटी येथील बळी मंदिर आग्रा रोडवरील शुभ मंगल कार्यालयात हा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
या प्रतिष्ठित पुरस्काराचे स्वरूप फेटा, ब्लेझर, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे होते. कार्यक्रमाला लखोजीराजे जाधव यांचे १६ वे वंशज प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराजे जाधव, कालिकादेवी मंदिर संस्थान नाशिकचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील, डी.एस.एफ. नाशिकचे अध्यक्ष श्री अशोक दुधारे आणि उपाध्यक्ष श्री आनंद खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी वसपटे यांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे श्री नामदेव शिरगावकर, अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पूर्णपत्रे, सचिव रवींद्र सोनवणे, जिल्हा सचिव प्राध्यापक संतोष गवळी, विस्तार अधिकारी लकप्पा पुजारी, नागणसूरचे केंद्रप्रमुख राजकुमार नरोने तसेच नागणसूर केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.




















