पंढरपूर – निर्भया पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे पंढरपूर ग्रामीण हद्दीत व पंढरपूर तालुका हदिदत असे दोन एकाच दिवशी बालविवाह दि.३० ऑगस्ट रोजी १२.३० वाजता होणार होते. मात्र,निर्भया पथकाने वेळीच पावले उचलत १५ वर्षे वयाच्या दोन्ही मुलींचे बालविवाह रोखले आहेत. या मुलींना पोलीसांनी पुन्हा एक प्रकारे जीवनदान दिले आहे.
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत या दोन्ही ठिकाणी निर्भय पथक टिम रवाना करुन त्या ठिकाणी जावुन चौकशी केली. तेव्हा मुलीचे नातेवाईकांनी आधारकार्ड दाखवताच एका मुलीचे वय हे फक्त १४ वर्षे ११ महिने व दुस-या मुलीचे वय हे १५ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलीस पथकाने जास्तीची चौकशी करत त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला मिळवला. त्यावरही त्यांचे वय तसेच दिसुन आले. त्यानंतर मंडपातील मंडळींना व वडीलांना योग्य ती समज देवुन सदर बालविवाह रोखण्यात आलेला आहे. त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती सोलापूर यांच्यासमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले. या घटनेमूळे पंढरपूर तालुक्यात बालविवाह लावणाऱ्यांचे व करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रेरणा कट्टे, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव-रावण, पोसई भोसले, पंढरपूर तालुका पो ठाणे., पोकॉ शशिकांत सावंत, वाघे , सपोफौ अरुण राजकर, पोकॉ काळे, चापोकॉ माळी,यांनी पार पाडली आहे.
————–
(निर्भया पथकाचे आवाहन)
निर्भया पथक पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, अशा घटना या वारंवार होत आहेत.अल्पवयीन मुलींचे जीवन हे खुलण्याआधीच तिच्यावर जबाबदारींचे ओझे वाहणे बंद करावे. जर अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास निर्भया पथकास संपर्क करावा. कोणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करेल अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
Post Views: 10