माळशिरस – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी १२ व्या शतकातील महादेव मंदिर असून अनेक जुन्या ग्रंथात असून हे मंदिर सोमेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते.या मंदिरात केलेले कोरीव काम हे चालुक्यकालीन स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.या मंदिरात श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.या मंदिराच्या गर्भगृहात छताला उत्तम दगडी रचना आहे.गाभाऱ्यात पाताळलिंगसदृश्य लिंग आहे .गर्भगृहात महादेवाची पुरातन पिंड आहे.प्रवेश द्वारावर सुरेख कोरीव नक्षीकाम केलेले आहे.त्याचप्रमाणे मूर्ती कोरल्या आहेत.गर्भगृहापुढे पुरातन गणेशाची मूर्ती आहे.तसेच दुर्मिळ वराहाची मूर्ती आहे.या मंदिराची बांधणी सिमेंट अथवा चुन्यात झालेली नसून एकात एक दगड गुंफून लॉक पद्धतीने झालेली आहे.मंदिराचे शिखर उंच आहे.मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे.श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात .
वैशिष्ट्यापूर्ण योजनेतून मंदिराचा जिर्णोद्धार
वैशिष्ट्यापूर्ण योजनेतून ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता .या निधीमधून मंदिरा समोर मोठा सभामंडप,संरक्षक भिंत ,विद्युतीकरण ,रस्त्या पर्यंत पेवर ब्लॉक,मोठी कमान व त्यास गेट बसविण्यात आले असून रंगकाम करून नुतनीकरण करण्यात आले आहे.
या मंदिराच्या उभारणीवरून व आतील कलाकुसरीवरून हे मंदिर १२ व्या शतकातील चालुक्यकालीन असून पेशवे मंदिर कोष दप्तरात याची नोंद आहे.यातील मोडी लिपीच्या कागदपत्रावरून हे कळते
Post Views: 7