श्री अमोल भागवत निंबाळकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर कडून ‘ अ स्टडी ऑफ जॉब सॅटिसफॅक्शन ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ‘या कॉमर्स विषयातून एचडी पदवी प्रदान करण्यात आली.
यासाठी प्रा.डॉ. शिवानंद भांजे वाणिज्य विभाग प्रमुख ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर यांचे मार्गदर्शन लाभले. व्हायवा – वोस साठी प्रा डॉ एस आर ढेरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे अधिष्ठाता (Dean), दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस व्ही शिंदे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शोधनिबंधासाठी मा. प्राचार्य प्रा डॉ. एस के पाटील बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी, प्रा डॉ श्रीकांत दुधाळ अध्यक्ष अकाउंटन्सी बोर्ड ऑफ स्टडीज व प्रा डॉ ए एच बोबडे अध्यक्ष वाणिज्य बोर्ड ऑफ स्टडीज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, तसेच प्रा डॉ ए व्ही साखरे संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रेल डाक सेवा ब मंडळ पुणे व सोलापूर डाक विभागाचे सहकार्य लाभले.
या याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा डॉ एस व्ही शिंदे यांनी सत्कार करीत अभिनंदन पर शुभेच्छा दिल्या.
Post Views: 50