सोलापूर – श्रावण महिन्यात शहर परिसरातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लागते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात 1975 साली पासून कै. उमाकांत सावळगी,कै.पावडेप्पा भुशेट्टी,संगप्पा बुरकुले, यांनी सुरवात केली या पदयात्रेचे 51 वे वर्ष आहे.सध्या बसवराज सावळगी, शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते.
सोलापूर सालाबादप्रमाणे श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वर बॅलन्स स्थापन केलेल्या 68 लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन 68 लिंग भक्त मंडळ वैरशैव व्हिजन सोलापूर यांच्या वतीने करण्यात येते.
ही पदयात्रा सुरुवात सिद्धेश्वर मंदिर येथून निघून डफरीन चौक,रेल्वे स्टेशन,उमा नगरी,छत्रपती शिवाजी चौक, सम्राट चौक,बाळीवेस , चाटी गल्ली, शिवानुभव मंगल कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व *68 लिंग पदयात्रेतील पायी जाणाऱ्या 600 भक्तांना सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संस्था आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने *साबुदाणा, केळी, वेफर्स, शाबू चिवडा, बटाटा चिप्स, शेंगा लाडू, काजु चिक्की, पाण्याची बॉटल, चहा* इत्यादी सर्व भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी आनंद तालिकोटी ( अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था) देविदास चेळेकर ( संचालक आस्था सामाजिक संस्था)सुहास छंचुरे ( प्रसिद्धीप्रमुख आस्था सामाजिक संस्था) संतोष सावळगी, वेदांत तालिकोटी,यांची प्रमुख उपस्थिती होती.
*आनंद तालिकोटी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की गेल्या नऊ वर्षापासून संस्था दहा वर्षांपासून 68 लिंग पदयात्रेतील भक्तांना फराळाचे वाटप करण्यात येते सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाच्या ऋण फेडण्यासाठी संस्था काम करत आहे*
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू कस्तुरे, उदय छंचुरे,सुरज छंचुरे, अथर्व शिंदे, वेदांत तमशेट्टी,धानेश सावळगी यांनी परिश्रम घेतले
Post Views: 21