अक्कलकोट – मागील वर्षी अतीवृष्ठीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले तर यंदा अनावृष्ठीने खरीप हंगाम पिके नष्ठ झाली आहेत . उडीद मुग सुर्यफुल तुर बाजरी मका आदि पिके पावसाअभावी जळुन गेली आहेत अनेक शेतकऱ्यांनी पावसाअभावी करपलेली पिकांवर नांगर चालविला आहे . ऐन पावसाळ्यात पावसाअभावी तालुक्यातील बहुतांश नदी ओढे नाले कोरडे पडली आहे तीव्र पाणी टंचाईसह तालुक्यात दुष्काळाची छाया गडद झाली आहे . खरीप हंगाम पावसाअभावी वाया जाण्याची स्थिती असुन सारी भिस्त शेतकऱ्याची आता रब्बी हंगामावर अवलंबुन आहे .
: पावसाने पाठ फिरवल्याने अक्कलकोट तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाचा दीर्घ खंड पडल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध झालेल्या जुजबी पावसाच्या भरवशावर अल्प ओलीवर खरीप पेरण्या उरकल्या. मात्र पेरणीनंतरही पावसाने पुन्हा मोठीदडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे . अनेक ठिकाणी पिके पावसाअभावी जळाली आहेत . . उत्पादनाची आशा मावळल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या उडीद मुग सुर्यफुल तुर मका बाजरी पिकावर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. बागायतदार शेतकऱ्याचे पावसाअभावी ऊस चिपाड झाले आहे .फळ बाग केळी दाळीब द्राक्षे संकटात आहेत . हात उसने कर्ज घेऊन कुपनलीका घेऊन पिके जिवंत ठेवण्याचा खटाटोप चालू आहे . शेतकऱ्यचे कर्ज वाढले आहे त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
अक्कलकोट तालुक्यात यंदा उडीदाचे तब्बल १० हजार ४२३ हेक्टर, तर मुगाचे १ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी उडीद पिकाला पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर आवश्यक त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने पिकांची वाढ अपेक्षित पद्धतीने झालेली नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाने शेतकऱ्यांची मोठी परीक्षा घेतली. ८ ते २८ जून तसेच ८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत तब्बल दोन वेळा २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे पेरणीनंतर पिकांना आवश्यक असलेली ओलावा व पाण्याची मात्रा मिळू शकली नाही. २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
खर्च करूनही पदरी निराशाच
महागडी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके तसेच मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. अनेकांनी कर्ज काढून अथवा उसनवारी करून खरीप हंगामाची तयारी केली. पेरणीनंतर चांगला पाऊस पडेल आणि पीक जोमाने वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे.
तालुक्या
तील अनेक गावांमध्ये उडीद पिकाची परिस्थिती गंभीर बनली असून शेतकऱ्यांकडून उभ्या पिकावर नांगर फिरवला जात आहे. काही शेतकऱ्यांनी उभे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडून दिले आहे. पीक वाचण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आता रान स्वच्छ करून रब्बी हंगामाच्या आशेने पुढील तयारीला लागले आहेत.
“यंदासारखी परिस्थिती कधीच आली नव्हती. महागडी बियाणे व खते घेऊन मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. मात्र पाऊस न झाल्याने पिकांची वाढच झाली नाही. उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याने उडीद पिकावर नांगर फिरवावा लागत आहे. आता रब्बी हंगामाच्या आशेने रान स्वच्छ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही,” अशी व्यथा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामावर आलेले संकट लक्षात घेता संबंधित विभागाने पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घ्यावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
Post Views: 12