सोलापूर : शहरातील व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या सोलापूर शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर. के. इव्हेंट्स अँड एक्झिबिशनच्या वतीने आयोजित या भव्य एक्स्पोमध्ये ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, सोलार, बँकिंग, फायनान्स, फर्निचर, एज्युकेशन यांसह विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या व व्यावसायिक सहभागी झाले आहेत.
एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करत ‘इन्स्पिरेशन वूमन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. चंद्रिकाताई चौहान, मंगलाताई कोल्हे, अंजली चव्हाण, नंदा भट्टड, देवांशी जव्हेरी, नंदा करवा, निलाशा नोगजा, डॉ. स्नेहल पवार, दीपाली कल्याणशेट्टी आणि संगीता सारडा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सोलापूरची सकारात्मक ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्ती व डिजिटल प्लॅटफॉर्मचा ‘सोलापूर बेस्ट रील स्टार अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला. प्रसाद लिमये, मयुरेश मंकेश्वर, सोलापूर जंक्शन संदेश आणि सोलापूर डायरी 13 यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एकाच छताखाली विविध क्षेत्रांचा मेळा
एक्स्पोमध्ये फॉक्सवॅगन कार, लक्ष्मी ऑटोमोबाईल, जोगेश्वरी सोलार, ब्रह्मा डेव्हलपर्स, क्रिस्टल डेव्हलपर्स, श्री स्वामी समर्थ रिअॅलिटी, फायसन सोलार, मोंढे मोटर्स, शुभम ग्रुप, तत्त्व सोलार, डिब्बो एज्युकेशन, सोलार पॉवर, यश डेव्हलपर्स, नेक्सा EV, डायमंड डेव्हलपर्स, पी. एन. रिअल इस्टेट, राहुल डेव्हलपर्स, स्कायलाइन प्रॉपर्टीज, लोकमान्य मल्टिपर्पज बँक, लोकमंगल बँक, हॅप्पी होम फर्निचर, स्नेहरिका ग्रुप आदींचे स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
रिअल इस्टेट विभागात विविध गृहप्रकल्प, फ्लॅट्स आणि प्लॉट्सची माहिती उपलब्ध आहे. सोलार विभागात सौरऊर्जा प्रणाली, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. ऑटोमोबाईल विभागात नवीन वाहन मॉडेल्स आणि आकर्षक ऑफर्स पाहण्याची संधी मिळत आहे. तर बँकिंग व फायनान्स विभागात विविध कर्ज योजना आणि आर्थिक सेवांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोलापूरच्या व्यावसायिक विश्वाचे भव्य व्यासपीठ
व्यावसायिक, उद्योजक आणि ग्राहकांना एकाच छताखाली आणण्यासोबतच नव्या व्यवसाय संधी, उत्पादने, सेवा आणि गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी काम या एक्स्पोच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे खरेदीपासून व्यवसाय आणि गुंतवणुकीपर्यंत विविध संधींचा अनुभव देणारे व्यासपीठ म्हणून या एक्स्पोकडे पाहिले जात आहे.
यावेळी आर. के. इव्हेंट्सचे कमलेश शिंदे, जगदीश बोगा, रोहित जोगीपेठकर, वैभव गायकवाड, संतोष बगळे, माधव साळुंखे, दीपाली कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती इराबत्ती यांनी केले.
आज एक्स्पोचा शेवटचा दिवस!
सोलापूरकरांसाठी आज एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत एक्स्पो नागरिकांसाठी खुला राहणार आहे. विविध क्षेत्रांतील आकर्षक स्टॉल्स, उत्पादने, सेवा आणि विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


















