कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून समारंभाचे आयोजन केले. यामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. प्रास्तविक शाखा व्यवस्थापक श्री वल्लभ कुलकर्णी यांनी केले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री सचिन साळुंखे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गुणांचे उद्बोधन श्री आनंद देशपांडे यांनी केले. विद्यार्थ्यांजवळ लागणारे नऊ सदगुण कोणते त्याचा परिणाम काय याबद्दल थोडक्यात विवेचन करून, या गुणांची जोपासना करण्याचे आवाहन केले.
शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सन्मान करून स्वतःच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षकांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाबद्दलचे मनोगत काही गोष्टी रूपाने सांगून वाहवा मिळवली.
या कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
इतनी शक्ति हमें देना दाता .. या सामूहिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















