टेंभुर्णी – येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी मा.आमदार बबनदादा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.अमृता विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी कुर्डूवाडी येथील रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनंजय चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 11