अकलूज – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला ७५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यभर विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानोबारायांचे विचार,साहित्य आणि महान जीवनकार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.याच उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘ज्ञानमाऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकलूज येथे चंदनकर क्लासचे संचालक ॲड.अमोल चंदनकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत चंदनकर,ह.भ.प. सुरेश वेदपाठक महाराज,माजी पोलीस अधिकारी बबनराव साळुंखे,हर्षवर्धन नाचणे सर उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते विठ्ठलांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ संग्रामनगर (ता.माळशिरस) यांच्या वतीने ह.भ.प.सुरेश वेदपाठक महाराज,चित्रपट अभिनेते व संगीत शिक्षक यांनी या कार्यक्रमात किर्तनाची सेवा केली.लहान मुलांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून आगमन झाल्यामुळे या कार्यक्रमात रंगत आली.यामध्ये निरंजन रविंद्र बोके (निवृत्तीनाथ), विजेंदर राजाराम यादव (ज्ञानेश्वर महाराज),रोहन रविंद्र सपलगे (सोपान देव),कु.प्रियंका विनोद तेलंगण (मुक्ताबाई) यांनी संतांची भूमिका केली होती.त्यानंतर भजनाचा व किर्तनाचा कार्यक्रम पार पाडला.त्यांना हार्मोनियमची साथ प्रशांत महामुनी,पकवाज वादन मुरलीधर पंडित केले.
*चौकट*
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेले विचार हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून मानवता,समता, निसर्ग,ज्ञान आणि विवेकाचा व्यापक संदेश देणारे आहेत.
त्यांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि ज्ञानोबारायांचे साहित्य,तत्त्वज्ञान व विचार अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत.या उदात्त उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्ञानोबारायांच्या विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचावा आणि त्यांच्या ज्ञान,समता व मानवतेच्या संदेशातून एक सुसंस्कृत समाज घडावा, हीच या ‘ज्ञानमाऊली’ कार्यक्रमामागील प्रेरणा आहे.
*ॲड.अमोल चंदनकर
Post Views: 11