मोडनिंब – मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोडनिंब (ता. माढा) येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज सोमवार (दि. ७)रोजी मोडनिंब शहर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शहरातील सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.




















