रतनचंद शहा बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे दि. ०७/०९/२०२६ रोजी संपन्न झाली. बँकेस गतवर्षीच्या तुलनेत काम समाधानकारक झाले आहे. बँकेचा CRAR ९.५०% नेट वर्थ ४७५ लाख, भाग भांडवल १८५२ लाख व ढोबळ नफा २७५ लाख एवढा झाला आहे. तसेच एनपीए वसुली १४७५ लाख एवढी झाली आहे, असे बँकेचे चेअरमन श्री. राहुल शहा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याबाबत उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले. मार्च २०२७ पर्यंत मागील वर्षापेक्षा जास्त थककर्ज वसुली करु असे आश्वासन दिले तसेच बँकेबाबत काही लोक सोशल मिडियाच्या माध्यमातुन बदनामीकारक मजकुर प्रसिध्द करीत आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवु नये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे निर्देशाप्रमाणे बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी कामकाज करीत आहेत. सभासदांनी बँकेवर ठेवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. कोरोना काळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी वेळ गेला परंतु मागील दोन वर्षात जवळपास ३० कोटी वसुल झाला आहे, असे सांगितले.
बँकेचे संचालक श्री. राजेंद्रकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. वरीष्ठ अधिकारी श्री. दयासागर देशमाने यांनी अहवाल वाचन केले. बँकेचे व्हा. चेअरमन महादेव माळी, संचालक अजिम शेख, संतोष बुरकुल, मुझफ्फर काझी, नागेश राऊत, किरण क्षिरसागर, तज्ञ संचालक उदयसिंग राजपुत, सौ. अश्विनी शहा व चंदाराणी कोंडुभैरी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किशोर ब्रम्हे, प्रशासन विभाग प्रमुख श्री. दत्तात्रय शिर्के तसेच अधिकारी वर्ग, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. संचालक श्री. राजेंद्रकुमार जाधव यांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























