सोलापूर – अज्ञात चोरट्याने पायपुसणीखाली ठेवलेल्या चावीने घराचे कुलूप उघडून कपाटातील ३ लाख रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सलगर वस्ती भागातील सनथ नगर, गैबीपीर दर्गाजवळ ९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत संतोष आप्पाराव बिराजदार (वय ४६, रा. प्लॉट नं. १२२/१२३, सनथ नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून सलगर वस्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी हे ८ सप्टेंब रोजी सकाळी सहा वाजता संतोष बिराजदार हे तेलगाव येथील शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांची मुलगी स्नेहा व मुलगा संकेत कॉलेजला सकाळी ११ वाजता गेले, तर वडील मंदिरात गेले. त्यानंतर पत्नी पदमिनी व लहान मुलगा सुमित यांनी घराला कुलूप लावले चावी नेहमीप्रमाणे दारासमोरील पायपुसणीखाली ठेवून गेले होते. सर्वजण सायंकाळी परतले . दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी हे बँकेचे पासबुक काढण्यासाठी घरातील लोखंडी कपाट उघडले असता कपाटाच्या ड्रॉव्हरमधील दिड तोळ्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याची अंगठी व अर्धा तोळ्याचे कर्णफुल असे एकुण ३ लाखाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरात व कपाटात सर्वत्र शोध घेतला मात्र दागिने मिळाले नाहीत. कोणीतरी अज्ञात चोरट्याने पायपुसणी खालच्या चावीने कुलूप उघडून दागिने चोरून नेल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार सुरज कुतवळ हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 15