पिलीव – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील कु पुनम तुषार लवटे हिने दैदीप्यमान यश संपादन करीत सहहायक महसुल अधिकारी पदाला गवसणी घातली .पहिल्याच प्रयत्नात तिने ही यश मिळविले. तिचे प्राथमिक शिक्षण कुसमोड येथील जिल्ह्य परिषद शाळेत, त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजमधये तर बि एससी ( पदवीपर्यंतचे ) शिक्षण पानीव येथील श्रीराम शिक्षण संस्थेत झाले.तिच्या ह्या दैदीप्यमान यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.ती कुसमोडचे माजी सरपंच तुषार लवटे यांची कन्या आहे. फोटो _ कु पुनम लवटे
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















