माळशिरस – तालुक्यातील पिलीव येथील नाभिक समाज संघटनेकडून सद्गुरु श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी पारंपारिक पद्धतीने भक्तीमय वातावरणात मोठया उत्साहात पिलीव येथील खडेश्वर महादेव मंदिराज शेजारी नाभिक समाज मंदिरामध्ये साजरी करण्यात आली .प्रारंभी
यावेळी वीर जीवा महाले व वीर शिवा काशीद स्वखर्चातून नाभिक समाज मंदिराचे स्वर्गीय श्रीमती पार्वती काळे यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आलेल्या वीर जीवा महाले व वीर शिवा काशीद या पुतळ्याचे स्वर्गीय श्रीमती पार्वती बाई काळे सभागृह यांचे पुतळ्यांचे अनावरण व स्वर्गीय पार्वती सिद्धेश्वर काळे सभागृहाचे अनावरण करण्यात आले .
यावेळी पिलीव चे नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष मंगेश वाघमारे उपाध्यक्ष अमोल काळे ,तन्मय काळे नवीन कुमार काळे रणजीत काळे,निलेश शिंदे, किशोर काळे विनायक काळे, नंदकुमार काळे महेश काळे ,सचिन वाघमारे , सारंग काळे ,लक्ष्मण काळेव इतर मान्यवर समाज बांधव उपस्थित होते .
यावेळी ह भ प विजयकुमार सावंत महाराजांचे जगद्गुरु श्री संत सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावरील साधारण दाखले देत पांडुरंगाचे कसे निशीम भक्त होते याची उदाहरणे देत कीर्तन केले. त्यांना साथ संगत पिलीव येथील भजनी मंडळांनी दिली सर्व देवतांचे सामूहिक आरती नंतर यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अमोल मदने पाटील ,जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव,पंचायत समिती सदस्या सौ.नम्रता पूकळे अरीफखान पठाण ,गणेश पाटील माजी सरपंच नितीन मोहिते माळी , माजी सदस्य राजाभाऊ काकडे केशव मेटकरी आदी मान्यवर उपस्थित होते .
फोटो जगद्गुरु श्री संत सेना महाराज स्वर्गीय श्रीमती पार्वती काळे सभागृहाचे व वीर जीवा महाले व वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी
Post Views: 16