अक्कलकोट – वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर सूचक मेळावा सोलापूर येथे रविवार, २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार
असल्याची माहिती चालता बोलता वधू-वर सूचकचे संस्थापक अध्यक्ष इरण्णा पनशेट्टी यांनी दिली.
आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली २७ सप्टेंबर रोजी गोविंदश्री मंगल कार्यालय, सोलापूर
येथे सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यास डॉ. श्रीकांत माकम, न्या. विष्णू दासरी, सिद्धेश्वर कारखान्याचे
संचालक राजशेखर पाटील, संचालक शिवानंद पाटील, संचालक लक्ष्मण झळकी, संजीव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विकास बुळ्ळा,नगरसेवक शिवा बाटलीवाला, भीमण्णा ग्वाड्याळ, अण्णाराव
याबाजी, साधू पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
श्री बसवेश्वर प्रशाला शालेय समिती चेअरमन गौरीशंकर मजगे, राजशेखर चौधरी,राघवेंद्र बिराजदार ,मल्लिनाथ याळगी, दत्ता शिंदे, राजेश पारसे, सिद्धेश्वर कल्लूरकर, गजानन ग्वाड्याळ, नूतन बिजापूर, सुरेश वाले, गुरु हिप्परगी आदींनी कार्यक्रम तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र,
कर्नाटक व महाराष्ट्राबाहेरील राज्यातील स्वामी, लिंगायतमधील सर्व उपजातीचे वधू-वर, पालकांनी नोंदणी करून उपस्थित राहावे, असे आवाहन
विश्वनाथ कापसे यांनी केले आहे.
Post Views: 8