जेऊर – पुणे येथील *मेडीरिल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड* कंपनीने सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरड (ता. करमाळा) या शाळेला ६५ हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे.
कंपनीचे सर्वेसर्वा *श्री. अनुप रिंगणगावकर व श्री. अपूर्व रिंगणगावकर* यांनी कंपनीचे मॅनेजमेंट प्रमुख*श्री. गणेश पाखरे* यांच्या समन्वयातून ही मदत उपलब्ध करून दिली. या अंतर्गत शाळेला *एक अत्याधुनिक प्रिंटर, ४३ इंची एलईडी टीव्ही व तीन ग्रीन बोर्ड* देण्यात आले आहेत.
या साहित्यामुळे शाळेत डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होणार आहे.
साहित्य प्रदान सोहळा नुकताच शाळेत पार पडला. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , उमरड गावाचे सरपंच , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गणेश पाखरे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने मेडीरिल कंपनीने ही मदत केली आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.”
कंपनीच्या या उपक्रमाबद्दल शिक्षण विभाग व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
Post Views: 20