जेऊर – करमाळा येथील सर्वोदय प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधत *बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन* केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावर्षी दि. 19 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 असे सलग तीन दिवस ही व्याख्यानमाला येथील *यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये* दररोज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.
या व्याख्यानमालेमध्ये शनिवार दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथील कवी, लेखक व चित्रपट कथालेखक चला हवा येऊ द्या फ्रेम प्रसिद्ध साहित्यिक *अरविंद जगताप* यांचे *गोष्ट छोटी डोंगराएवढी* या विषयावर, तर रविवार दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी पुणे येथे प्रसिद्ध लेखक *देवा झिंजाड* यांचे *”एक भाकर तीन चुली”* या विषयावर आणि सोमवार दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी माजलगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी *प्रभाकर साळेगावकर* यांचे *”क्रिएटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी”* या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. तरी करमाळ्यातील सर्व विद्यार्थी, पालक व रसिकांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Post Views: 10