सोलापूर – नेहरू वसतिगृहाच्या जुन्या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित करण्यात आलेले स्ट्रक्चरल ऑडिट तब्बल नऊ लाख रुपये शुल्क अदा करूनही रखडले आहे. जिल्हा परिषदेने हे काम शासकीय तंत्रनिकेतनकडे सोपविले होते; मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ऑडिट करणे शक्य नसल्याचे संस्थेने कळविले आहे. त्यामुळे आता सक्षम तांत्रिक संस्थेचा नव्याने शोध घेण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे.
नेहरू वसतिगृहाची इमारत जुनी असल्याने तिच्या बांधकामाची सद्यस्थिती, मजबुती, संभाव्य धोके आणि आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीबाबत निर्णय घेण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासकीय तंत्रनिकेतनची निवड करून त्यांना सुमारे नऊ लाख रुपयांचे शुल्कही अदा केले. मात्र, कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण देत संस्थेने हे काम पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविली. परिणामी, अद्याप ऑडिटचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळालेला नाही.
( टीप नेहरू वस्तीगृह आणि उपाध्यक्ष तसेच अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांचे फोटो लावणे)
आता जिल्हा प्रशासनाकडून वालचंद पॉलीटेक्नीक किंवा स्वेरी पॉलीटेक्नीकल महाविद्यालय यापैकी सक्षम संस्थेकडून ऑडिट करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. इमारतीच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब असल्याने विलंब न करता तांत्रिक तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ऑडिट अहवालानंतर इमारतीची दुरुस्ती, मजबुतीकरण किंवा आवश्यक असल्यास पुनर्बांधणीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतनकडे मनुष्यबळाअभावी काम पूर्ण झाले नसल्याने जिल्हा परिषदेने अदा केलेली नऊ लाख रुपयांची रक्कम अडकली आहे. ही रक्कम व्याजासह परत वसूल करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
कोट
शासकीय तंत्रनिकेतनकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले नाही. मात्र, अदा केलेले नऊ लाख रुपये व्याजासह वसूल करण्यात येतील,” असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी स्पष्ट केले.
कोट
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनीही सक्षम तांत्रिक संस्थेकडून ऑडिट करून घेऊन त्यानुसार इमारतीच्या सुरक्षिततेबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.