सोलापूर : जुना विडी घरकुल येथील सामाजिक कार्यकर्ते अमृतदत्त चिन्नी यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने बुधवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. स्मृती केंद्राचे अध्यक्ष हेमूजी चंदेले यांच्या हस्ते चिन्नी यांचा सत्कार झाला.
यावेळी स्मृती केंद्राचे सचिव रवींद्र मोकाशी, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव तोळणूरे, देशभक्त छन्नुसिंह चंदेले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काकासाहेब गाढवे, भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल चंदेले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी तोळणूरे, गाढवे व गायकवाड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
Post Views: 14