बार्शी – सोजर कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट विविध शैक्षणिक, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) यांच्या निर्देशानुसार यावर्षी “स्वस्थ भारत : कॉम्बॅटिंग अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स – एम्पॉवरिंग फार्मासिस्ट फॉर हेल्दियर फ्युचर्स” या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन तसेच फार्मसी क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व व फादर ऑफ फार्मसी म्हणून ओळखले जाणारे प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनुजा खिस्ते व कु. राजनंदनी जानराव यांनी केले. महाविद्यालयातील सर्व नोंदणीकृत फार्मासिस्ट तसेच भावी फार्मासिस्ट असलेल्या विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयातील नोंदणीकृत फार्मासिस्ट, अध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांनी फार्मासिस्टच्या आरोग्य सेवेतील महत्त्वपूर्ण भूमिकेवर मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मासिस्टची रुग्णसेवा, औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, समाजाप्रती असलेली जबाबदारी तसेच अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स रोखण्यासाठी फार्मासिस्टने बजावावयाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक प्रा. मनीषा लवटे यांनी “भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात फार्मसी व्यवसायाचे महत्त्व” या विषयावर समुपदेशनपर मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मसी व्यवसायातील विविध संधी, व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त दिवसभर विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रील मेकिंग, क्विझ, स्ट्रीट प्ले, लीफलेट मेकिंग तसेच रक्तदान शिबिर यांचा समावेश होता. पीसीआय यांनी सुचविलेल्या अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स या विषयावर आधारित या उपक्रमांमध्ये बी फार्मसी आणि डी फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आयोजित रक्तदान उपक्रमात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. मनीषा लवटे, डॉ. स्वप्निल पौळ, शेख अखलाख, संतोष मोकाशे आणि मेघराज पाटील यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवाजी पाटील, डॉ. शशिकांत मोडेकर, अजय साळवी, आसिफ अत्तर आणि अक्षय रिकिबे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे संस्थापक अरुणदादा बारबोले व सचिवा सौ. कल्पनाताई बारबोले यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Post Views: 12