बार्शी – रणवीर राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था व श्री माऊली नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री माऊली चषक’ खुली राज्यस्तरीय एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मराठा मंदिर, छत्रपती कॉलनी, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे होणार आहे.
ही स्पर्धा खुला गट व U-१३ अशा दोन गटांत होईल. खुल्या गटात खुला, U-१७, महिला व ज्येष्ठ नागरिक ५०+ तर U-१३ गटात U-१३, U-११, U-९ व U-७ असे उपगट असतील. एकूण ४२ हजार ६०० रुपये रोख, २१ ट्रॉफी व ५४ पदके अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खुल्या गटातील विजेत्यास ५,००० रुपये रोख व ट्रॉफी, तर U-१३ गटातील विजेत्यास १,५०० रुपये रोख व ट्रॉफी दिली जाणार आहे.
स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून नोंदणीची अंतिम तारीख २ ऑक्टोबर आहे. स्पर्धेच्या दिवशी स्पॉट एन्ट्री मिळणार नसल्याने इच्छुक स्पर्धकांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे श्री. सुमुख गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन वशिष्ठ गोरे, शिक्षक संघ बार्शीचे तालुका अध्यक्ष सचिन देशमुख, छत्रपती शंभूराजे संस्थेचे डॉ. चंद्रकांत उलभगत, दत्तात्रय गोरे, चेस क्लब बार्शीचे विद्याधर जगदाळे, सोमनाथ पांडेकर, अतुल नलगे, धनाजी लोखंडे, रोकडे आदी उपस्थित होते.
अधिक माहिती व नोंदणीसाठी सागर पालके (8830773508), उदय वगरे
(8888045344) यांच्याशी संपर्क साधावा.
Post Views: 11