बार्शी – क्रीडा युवक संचलनालय पुणे व बीड जिल्हा क्रिडा कार्यालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शालेय विभागीय वुशू स्पर्धा २४ सप्टेंबर रोजी बीड येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी व घाटशिळ उच्च माध्यमिक विद्यालय पारगावचा विद्यार्थी यशराज गणेश रोडे याने दमदार कामगिरी करत १९ वर्षांखालील वयोगटातील ८० किलो वजनगटात सिल्व्हर मेडल पटकावलं..
यशराजने स्पर्धेदरम्यान आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. त्याच्या या सातत्यपूर्ण सरावाचे आणि मेहनतीचे फळ म्हणून त्याला विभागीय स्तरावर सिल्व्हर मेडल मिळवून त्याने बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला…
यशराजला संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव, उपाध्यक्ष गणेश रोडे, सचिव सौ. सविता जाधव, सौ.स्नेहल रोडे, प्राचार्य एम.बी.सानप, क्रीडाशिक्षक बी.के.मुंढे, कोकाटे व अनिल खराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या व प्रशिक्षक यांच्यावतीने संचिती जाधव, अतुल जाधव, विश्वजीत जाधव, उमेश चव्हाण, रितेश जानराव, पृथ्वीराज रोडे या सर्व प्रशिक्षकांनी व पालकांनी यशराजचे अभिनंदन केले व पुढील त्यास राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 23