सोलापूर – संताची आणि हुतात्म्यांची भूमी असलेल्या सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा असल्याचे प्रतिपादन पाचवे नांदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक प्रकाशक रविंद्र गुर्जर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फाऊंडेशन, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य आणि वामसी लॅब यांच्या संयुक्तविद्यमाने लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये कवी संजीव व्यासपीठावर 5 वे नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा समारोप सायंकाळी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी, श्रृतीश्री वडगबाळकर, कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषा अनुबंध यावर हे 5 वे नांदी संमेलन आयोजन केले असून भाषा समृध्दीसाठी संमेलनाची गरज असल्याचेही गुर्जर यांनी सांगितले. जगातील 15 भाषामध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. म्हणूनच मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला असेही रविंद्र गुर्जर यांनी सांगितले.
हुतात्मा नगरीत हे 5 वे नांदी संमेलन होत आहे यामुळे येणार्या जानेवारी मध्ये होत असलेल्या पुण्यातील 100 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सोलापूरकर मोठ्यासंख्येने उपस्थित राहून सुवर्ण संमेलन यशस्वी करतील अशी अपेक्षा जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
सकाळी नॅशनल बुक ट्रस्टच्या फिरत्या पुस्तकालयाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर बहुभाषिक कवी संमेलन त्यानंतर युवा कवी संमेलन त्यानंतर ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांनी संगितबध्द केलेल्या गीतांवरील सूर काही राहिले हा कार्यक्रम वेणुगोपाल संगीतालय यांच्या वतीने सादर करण्यात आला आणि त्यानंतर सायंकाळी लेखक दिग्पाल लांजेकर निर्मित शिवरायांचा छावा हा एैतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये दिग्पाल लांजेकर, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे, अभिजित श्वेतचंद्र यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील अनेक शौर्य प्रसंग यावेळी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाने 5 वे नांदी संमेलनाचा समारोप करण्यात आला.

















